Katrina Kaif Bday : अशी आहे कतरिना कैफची बॉलिवूडमधील सुरुवात

shweta walge

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) तिच्या सौंदर्य आणि तिच्या अभिनयासाठी देशभर लोकप्रिय आहे. आपल्या कामाबद्दल गंभीर आणि स्वभावाने शांत असलेली कतरिना आज तिचा वाढदिवस (birthday) साजरा करत आहे.

1983 साली हाँगकाँगमध्ये जन्मलेली कतरिना ही एक ब्रिटिश मॉडेल (British model) आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पसंतीची अभिनेत्री आहे.

गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकलेली ही अभिनेत्री यावर्षी लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी ती तिचा पती अभिनेता विकी कौशलसोबत मालदीवला गेली आहे.

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेली कतरिनाचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण काही खास नव्हते. 'बूम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या कतरिनाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

मात्र, सुरुवातीच्या अपयशामुळे कतरिनाने हार मानली नाही आणि आज तिचा समावेश इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये झाला आहे.

मूळची परदेशी असल्यामुळे कतरिनाला हिंदी बोलण्यात खूप त्रास होतो. यामुळेच सुरुवातीला कतरिनाच्या चित्रपटांमध्ये तिचा आवाज डब करण्यात आला होता.

अभिनेत्रीने लहान वयातच शिक्षण सोडल्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षीच मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मॉडेलिंगच्या जगात यश मिळवल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये हात आजमावला. यादरम्यान सुरुवातीच्या अपयशानंतरही तिने हिंमत हारली नाही आणि यश मिळवले.

सलमान खानसोबत (Salman Khan) मैंने प्यार क्यूं किया या चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या यशानंतर कतरिनाची लोकप्रियता खूप वाढली. प्रत्येक प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याला तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होऊ लागली. अशा रीतीने हळूहळू कतरिना इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाली.

आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत कतरिनाने अनेक हिट-सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये नमस्ते लंडन, हमको दीवाना कर गए, सिंग इज किंग, एक था टायगर, टिग जिंदा है, अजब प्रेम की गजब कहानी यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.