shweta walge
सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) फ्रान्समध्ये सिनेमाची सर्वात मोठी स्पर्धा सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये देशातील आणि जगातील नामवंत व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) , यावेळी कान्समध्ये ज्युरी (Jury) सदस्य म्हणून काम करत आहे आणि दररोज रेड कार्पेटवर (Red carpet) तिचा वेगवेगळा लूक पाहायला मिळत आहे.
अलीकडेच तिने काळ्या रंगाच्या साडीत तिचा लूक दाखवला आहे आणि आता पुन्हा एकदा दीपिकाचा रॉयल लूक (Royal Look) कान महोत्सवातून समोर आला आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील दीपिका पदुकोणने शेअर केलेली नवीन फोटोमध्ये तिचा स्टाईल राणीसारखी दिसत आहे. त्या फोटोंमध्ये दीपिका पांढऱ्या रफल साडीत (Ruffle saree) दिसत आहे. त्याच वेळी, तिने ब्रॅालेट मॅचिंग ब्लाउज बनवून तिचा लूक बोल्ड केला आहे आणि पांढऱ्या मोत्यांच्या हेवी नेकपीससह लुकला रॉयल टच दिला आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत दीपिकाचे पारंपारिक ते वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्न (Indo Western) असे सर्व प्रकार समोर आले आहेत. दीपिकाचे अनेकांकडून कौतुक होत असतानाच तिला अनेकांकडून ट्रोलही व्हावे लागले. सध्या तिचा हा नवा लूक तिच्या सौंदर्यात भर घालत .
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिकाच्या हातात सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ती शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) पठाणच्या हिंदी रिमेकमध्ये आणि अमिताभ बच्चनसोबत द इंटर्नमध्ये दिसणार आहे.