Shweta Shigvan-Kavankar
फळे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतात आणि नाश्ता करण्यासाठी सर्वोत्तम असू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही फळ घेऊ शकता.
तुम्ही हेल्दी स्वरूपात मुरमुरे ट्राय करु शकता. चविष्ट आणि पौष्टिक ऑफिस ब्रेकफास्टसाठी मुरमुऱ्यामध्ये चिरलेला टोमॅटो, काकडी, स्प्राउट्स आणि पुदिन्याची चटणी घाला.
बदाम आणि अक्रोडापासून ते काजू आणि मनुका, सर्व ड्राय फ्रूट्स अतिशय आरोग्यदायी मानले जातात. परंतु लक्षात ठेवा की ते फक्त संतुलित प्रमाणात घेतले पाहिजेत.
प्रथिने, निरोगी आणि उत्कृष्ट चव यांचे परिपूर्ण मिश्रण म्हणजे भाजलेले शेंगदाणे. हा पौष्टिक नाश्ता बनू शकते. मूठभर शेंगदाणे खाल्यास तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होईल.
प्रथिने आणि इतर पोषक तत्वांव्यतिरिक्त मखनामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. हे जे तुमचं डाएट प्लॅनसाठीही फायदेशीर ठरू शकतात.
पॉपकॉर्न हा एक पौष्टिक ऑफिस स्नॅक आहे. यामध्ये फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असतात.
तुम्ही पोहे तुपात तळून त्यात शेंगदाणे, लोणी, मीठ, खोबरे आणि थोडी साखर घालून ऑफिसला नेऊ शकता.
तुम्ही स्प्राउट्सही घेऊ शकता. ते घरी तयार करणे देखील खूप सोपे आहे. मोड आलेले कडधान्यात तुम्हाला हवे असल्यास लिंबू, काळी मिरी आणि मीठ घालूनही खाऊ शकता.