Shweta Shigvan-Kavankar
गिरीश बापट यांचे 72 व्या वर्षी निधन झाले आहे. नगरसेवक ते खासदार असा राजकीय प्रवास बापट यांचा होता.
बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यानंतर ते जनसंघातून राजकारण आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली.
त्यांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली.
पुणे महानगरपालिकेत १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात बापट नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद त्यांनी राखले.
याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
१९९५ मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन् पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा निवडून आले.
पुणे जिल्ह्यात शरद पवारांचे वर्चस्व असताना बापट यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट पुण्याचे खासदार म्हणून विजयी झाले.
सर्वसमावेशक राजकारणी म्हणून पुण्याच्या राजकारणात जनमानसात ओळख आहे.
आजारी असूनही गिरीश बापट भाजपच्या प्रचारार्थ मैदानात उतरले होते.