Akash Kukade
झी मराठी वाहिनीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री 'सायली संजीव' आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे.
सायली संजीवने या मालिकेपूर्वी काही चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.
सायली संजीव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फोटोज व व्हिडिओज शेअर करत असते.
सायलीने नुकतच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतले काही मादक फोटो शेअर केले असून गुलाबी रंगाच्या साडीत सायलीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.
सायलीने गोल्डन रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. सध्या सोशल मीडियावर सायलीचा हा लुक चांगलाच व्हायरल झाला आहे.
सायली मूळची नाशिक शहरातील आहे. दरम्यान कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहत आहे. सायली झिम्मा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती.