IPL 2022| या सीजनमध्ये प्रथमच पंजाब किंग्जला चिअर करण्यासाठी प्रीती झिंटा स्टेडियममध्ये

shweta walge

पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटा (Preity Zinta) सोमवारी पहिल्यांदाच आपल्या संघाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली.

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पंजाब किंग्जची (Punjab Kings) सह-मालक आहे. संघाला पाठिंबा देण्यासाठी ती सतत स्टेडियममध्ये असते. पण यावेळी ती सुरुवातीपासून गेली नव्हती आणि 25 एप्रिलला पहिल्यांदाच स्टेडियममध्ये दिसली.

प्रीती झिंटा मैदानावर चौकार आणि षटकारांच्या गजरात प्रेक्षक गॅलरीतून संघाचा झेंडा फडकवताना दिसली. सध्या सोशल मीडियावर प्रीतीचे पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेले फोटो खूप व्हायरल होत आहेत.

पंजाब किंग्जचा संघ फलंदाजी करत असताना सीएसकेच्या खेळाडूंनी झेल सोडले. ज्यावर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया व्हायरल झाली.

यावेळी प्रीती झिंटा IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होऊ शकली नाही.आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करताना तिने सांगितले की, ती या लिलावाचा भाग होऊ शकणार नाही.

पंजाब किंग्जने हा रोमांचक सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 187 धावा केल्या. पंजाबकडून शिखर धवनने ८८ धावांची खेळी करत अनेक विक्रम केले.