Uncategorized

Russia Ukraine War : युद्ध संपणार? रशिया-युक्रेनमध्ये होणार चर्चा

Published by : Shweta Chavan-Zagade

रशिया-युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) मागील चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सोमवारी पाचव्या दिवशीदेखील युद्ध सुरूच आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात जगातील महत्त्वाचे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. रशियन सैन्यातील 4300 हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात 116 मुलांसह 1684 नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले.

दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एक आपात्कालीन विशेष सत्र बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत याबाबतच्या प्रस्तावाच्या बाजूने 11 मते पडली. तर, रशियानेच याच्या विरोधात मतदान केले. भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीने या मतदानात सहभाग घेतला नाही. 28 फेब्रुवारी 2022 रोजी बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघात 1950 पासून आतापर्यंत 10 विशेष आपात्कालीन सत्र बोलावण्यात आले होते. सोमवारी होणार ही बैठक 11 वी बैठक असणार आहे.

बेलारूसमध्ये युक्रेन-रशिया चर्चा होणार

दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि अन्य युरोपीयन देशांद्वारे रशियात लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर रविवारी रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यावर सहमती दर्शवली. रशियाचे सैन्य अधिकारी राजनयिक चर्चेसाठी बेलारूसच्या गोमेल शहरात दाखल झाले आहे.

युक्रेनमध्ये घनघोर युद्ध

रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू आहेत. रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रशियन फौजांनी कीवला वेढा घातला आहे. युक्रेनमधील दुसरे मोठं शहर खारकीवमध्ये दोन्ही देशांदरम्यान भीषण युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने या शहरात प्रवेश करण्यास यश मिळवले तरी युक्रेनच्या सैन्याकडून तीव्र प्रतिकार सुरू आहे. त्यामुळे रशियन सैन्य पुन्हा माघारी गेले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे