सनी देओलचा मुलगा करण देओल द्रिशा आचार्यसोबत विवाहबंधनात अडकला आहे.
18 जून रोजी दोघांचेही कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न झाले.
यानंतर, अभिनेत्याने सोशल मीडियावर आपल्या वधूसोबत लग्नाचे फोटो शेअर केले.
मंडपात करण आणि द्रिशा मेड फॉर इच अदर दिसत होते.
यानंतर देओल कुटुंबियांने ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवले होते.
यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
या रिसेप्शनमध्ये द्रिशाने शॅम्पेन रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिने कमीत कमी मेकअप, ज्वेलरीसह लूक पूर्ण केला. तर करण काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला.
हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
एका चाहत्याने लिहिले, खूप गोंडस दिसत आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले की, देओल घराण्याची सून असूनही द्रिषा इतकी साधी दिसत आहे.