वेब स्टोरीज

गणेशोत्सवावर पुष्पा, आरआरआर सिनेमाची जादू

यंदाही बाजारपेठेवर साऊथ चित्रपटांचीच चलती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

आज बाप्पाचं आगमन होत आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तर, यंदाही बाजारपेठेवर साऊथ चित्रपटांचीच चलती पाहयला मिळत आहे. बॉलीवूडमध्ये बड्या स्टार्सचे चित्रपट रिलीझ होऊनही काही खास जादू दिसली नाही. परंतु, साऊथ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवावर पुष्पा सिनेमाची जादू पाहायला मिळतेय. अनेक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती पुष्पा स्टाईलमध्ये घडवण्यात आली आहे.

'आरआरआर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

अल्लुरी सीतारामनची भूमिका राम चरणने निभावली होती. या लूकवर गणेशाच्या मूर्ती बनवल्या जात आहेत.

रामचरणचे पात्र रामायणातील भगवान रामापासून प्रेरित आहे. या लूकमध्येही बाप्पाचे लूक बाजारात पाहायला मिळत आहे.

आरआरआर चित्रपटात कोमाराम भीम या भूमिकेत ज्युनिअर एनटीआर झळकला होता. यावरही बाप्पाची मुर्ती साकारण्यात आली आहे.

एका सीनमध्ये ज्युनिअर एनटीआर वाघाशी लढताना दिसत आहे. यावरही बाप्पांना साकरण्यात आले आहे.

बाप्पाची मूर्ती चित्रपटातील व्यक्तिरेखेपासून प्रेरित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गणेशाच्या मूर्तीही बाहुबलीच्या व्यक्तिरेखेपासून प्रेरित होत्या.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी