महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे.
आज 12 वाजता रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई येथून या मोर्चाला सुरवात झाली आहे.
या मोर्चात शरद पवारांसह महाविकास आघाडीचे सर्वच बडे नेते सहभागी झाले आहेत.
हल्लाबोल महामोर्चासाठी महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळेही आणण्यात आलेत. माजी खासदार समीर भुजबळ नाशिकहून हे पुतळे घेऊन आलेत.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा रावणरुपी पुतळा मोर्चात दिसत आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपरुपी रावणाचे दहन आता महाराष्ट्रातील जनताच करणार, असेही फ्लेक्सवर लिहीले आहेत.
महाविकास आघाडीच्या मोर्चात सामील होण्यासाठी दत्ता परुळेकर बोरीवलीहून सायकलीवर आले आहेत. दत्ता 40 वर्षांपासून सायकलीवर फिरून शिवसेनेचं प्रचार करतात.
तर, दिल्लीत अमित शहांच्या शिंदे-फडणवीस-बोम्मई यांच्यासोबत बैठका, सीमालढ्याचे शेकडो कार्यकर्ते महामोर्चात दाखल झाले आहेत.
महामोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चानेही पाठींबा दिला आहे.
शिवसेनेच्या फायर आजीही महामोर्चात सहभागी झाल्या आहेत.
संजय राऊतही या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर खास वेशभूषेत दिसून आले.
तर, निष्ठावंताने ठाकरे परिवाराचे फोटोंनी सजवलेली गाडीसह महामोर्चात सहभागी झाले आहे.