पाटणमध्ये हर्षद कदम यांच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे भाषण करताना भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांवर हल्लाबोल करत सुरुवात करु लागले. यावेळी ते म्हणाले की, "जो करेल मला मंत्री त्याचा मी वाजंत्री" असा टोला त्यांनी विरोधकांना लावला आहे. तर पुढे ते म्हणाले की, याठिकाणी 3 उमेदवार आहेत त्यात एक आहे मस्तीमध्ये वागणार लुटमार मंत्री ज्याने स्वतःचा घरातील लग्नासाठी लूटमार केली.
आपली सत्ता येउद्या मग मी ही सगळी प्रकरण मार्गी लावतो. हे गुजरातच्या समोर झुकणारे ज्यावेळेस तुमच्या समोर येतील त्यावेळेस त्यांना विचारा माझ्या मुलाला अजून नोकरी का नाही आहे? आणि यावर ते काय उत्तर देतात ते पाहा. यालोकांनी अदानीचा घशात घातलेली मुंबई निकालानंतर मी माझ्या महाराष्ट्राला परत देईन असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी पाटण जनतेला केले.
शिंदेंना देखील आम्ही होम मिनिष्टर केला- उद्धव ठाकरे
ज्याप्रकारे मी बाकी उमेदवारांना देतो आहे त्याचप्रमाणे मी या शिंदेला दिल होत खउप काही दिल होत. याला होम मिनिष्टर केला होता पण याने काय केल, पोलीस प्रशासनाचा वापर केला आणि मिध्यांना पळून जायला मदत केली. सुरत आणि गुवाहटीला गेला ढोकळा खाण्यासाठी, तुला जर माझ्या महाराष्ट्राचं जेवण पचत नसेल तर मग गुजरातला जा आणि निवडणुका पण तिथेच लढव, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर केला आहे.
"शहजादेके मुहसे बाळासाहेब के लिये दो शब्द बुलवाओ" या मोदींनी केलेल्या आव्हानावर उद्धव ठाकरे म्हणाले,
मोदींनी उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलं होत ज्यात ते म्हणाले होते, शहजादे के मुहसे बाळासाहेब के लिये दो शब्द बुलवाओ या त्यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देत म्हणाले की, शहजादा म्हणजे ते राहुल गांधींच्या मुखातून बाळासाहेबांसाठी दोन शब्द ऐकु इच्छितात. काल प्रियंका गाधी आल्या होत्या शिरळीमध्ये आणि त्या म्हणाल्या मी राहुलची बहिण आहे आणि त्या बाळासाहेबांबद्दल चांगल बोल्या.
म्हणजे भाजपचे दात घातले घशात. भाजपची नीती आहे तोडा फोडा राज्य करा. मोदींनी आपल सरकार पाडल कारण त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता आणि तो मी लुटू देत नव्हतो म्हणून यांनी पहिला घाव हा शिवसेनेवर घातला जीला मराठी माणसाच्या आणि या महाराष्ट्राच्या न्यायासाठी हिंदुहृदयसम्रटांनी तयार केलं. माझ्या रक्तामध्ये गद्दारी नाहीच, अपक्षांना जे मदत करतील ते गद्दार नामर्दाची औलाद स्वतःच्या बापाचा फोटो लावा, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केला आहे.