विधानसभा निवडणूक 2024

Sunil Raut: सुनिल राऊतांकडून आज अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी राऊतांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

सुनिल राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर अर्ज भरण्यापूर्वी सुनिल राऊतांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

Published by : Team Lokshahi

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

सुनिल राऊत यांना विक्रोळीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर अर्ज भरण्यापूर्वी सुनिल राऊतांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. सुनील राऊत हे त्यांच्या निवासस्थानवरून निघाले असताना संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सुनील राऊत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघाले असून यारम्यान सुनिल राऊत म्हणाले का, गद्दारांना संपविण्यासाठी जमलेली लोक आहेत. गेली अडीच वर्ष छळ केला, महाराष्ट्राची जनता २३ तारखेला महाविकास आघाडीचे सरकार बसवेल व उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, माझ्या विरोधात उमेदवार मिळत नव्हता, बळीचा बकरा करण्यात आला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी