यावेळची विधानसभा निवणुक लक्षवेधी असल्याचं सांगितलं जातंय. बऱ्याच मतदारसंघात हायप्रोफाईल अशी लढत पहायला मिळतेय. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. तर शिंदेंच्या विरोधात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे हे निवडणूक लढणार आहेत.
आपल्या पक्षाच्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी प्रत्येकजण आता प्रचाराच्या तयारीला लागला आहे. अशातच आज भाऊबीज आहे आणि या भाऊबीजनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लाडक्या बहिणीने खंबीरपणे उभं रहावं असं आवाहन सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय.
तसंच महाविकास आघाडीच्या सर्व हालचाली दिल्लीतून चालतात असं संजय राऊत म्हणाले तरी वाईट वाटून घेऊ नका. ठाकरे गट हा पक्ष महिला विषयी आदर करत नाही. असं म्हणत पाटील यांनी मविआवर निशाणा साधलाय. यासोबतच अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी हात जोडून महिलांची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलीये.