संजय राऊत यांनी अमित शाहांना टोला लगवाला आहे. सावरकरांना भारतरत्न का देत नाही 370 हटवल्याने कोणालाच फायदे झाला नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात शाहांमुळे चिखल निर्माण झालं आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
यावर प्रत्युत्तर देत असताना नितेश राणे म्हणाले की, वीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी संजय राऊत यांनी अमित शाहांजवळ केली आहे. मीठाला न जागणारा नमक हराम म्हणजे हा संजय राऊत आहे. 370 हटवून काय फरक पडला हे जरा जम्मु-कश्मिरच्या चौकात जाऊन पाहा तिकडे जो तिरंगा फडकत आहे तो फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यामुळेच आहे. असं नितेश राणे म्हणाले.