यवतमाळ : दिग्रस मतदारसंघात महायुतीचे संजय राठोड पाचव्यांदा विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. संजय राठोड 1 लाख 43 हजार 115 मते घेतली. तर माणिकराव ठाकरे यांना 1 लाख 14 हजार 340 मते मिळाली. संजय राठोड यांचा 28 हजार 775 मतांनी विजयी झाले. महायुती सरकारने विकास कामे केली. त्यावर मतदारांनी विश्वास दाखवला, मतदारांना विकास हवा आहे अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.
दरम्यान, २० वर्षांनंतर पहिल्यांदाच आजी-माजी मंत्र्यांमध्ये थेट सामना झाला. काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे रिंगणात उतरले होते. तर महायुतीकडून विद्यमान पालकमंत्री आणि शिवसेनेचे संजय राठोड मैदानात होते.
दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघता, काँग्रेसची येथे मजबूत पकड होती. 1952 पासून आजपर्यंतच्या 15 निवडणुकांमध्ये काँग्रेसने 8 वेळा विजय मिळवला आहे. तर शिवसेनेने चार वेळा बाजी मारली आहे. विशेषतः गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा दबदबा राहिला. मात्र, शिवसेनेतील फूट आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित लढाईमुळे काँग्रेसला यावेळी पुन्हा विजय मिळवण्याची संधी होती.