रोहित पवारांनी राम शिंदेंवर निशाणा साधला आहे. यावेळा रोहित पवार म्हणाले की, आम्ही कोविडमध्ये काम करत होतो, पण तुम्ही घरी बसला होतात. फडणवीस यांनी आमचं कुटुंब फोडले आणि सत्तेत आले आणि तुम्ही मागच्या दरवाज्याने सत्तेत आलात. सत्तेत आल्यानंतर देखील मी पाण्याचे टँकर दिले होते पण यांनी ते थांबवले. ज्यावेळेस लंपी रोग आला तेव्हा देखील हे गायब होते आणि आता निवडणुकीत फिरत आहेत. राज्यात पहिला मतदार संघ माझा होता लंम्पिचं शंभर टक्के लसीकरण करण्यात आले होते. मग तेव्हा शिंदे कुठे होते? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे. तर पुढे रोहित पवार म्हणाले की, राम शिंदे आता गोरे होत चालले आहेत, कारण पाच वर्ष घरी बसले होते.
आम्ही मतदारसंघाला कुटूंबासारखा जपलं आहे मात्र गेल्या 5 वर्षात तुम्ही फक्त टीका केली. सत्ता महाविकास आघाडीची येणार 26 तारखेला आपल्याला शपथविधी करायच आहे. राम शिंदेना पार्टीकडून गबाड मिळालं प्रत्येकाला 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. चौडी ही पवित्रभूमि आहे तुमच्याकडे 12 खाती होती मात्र एकही रुपयाचा विकास तेथे केला नाही उलट बंगला बांधला, पुढची पाच वर्ष हा कार्यकर्ता महाराष्ट्रभर काम करणार, मोक्का लागलेले लोक घेऊन शिंदे प्रचाराला फिरत आहेत. दहशत सुरु आहे ही दहशत सपविण्याची आता वेळ आली आहे. 23 तारखेला सत्ता आल्यानंतर midc आणि शेतीसाठी पाणी आणणार.
फडणवीस यांनी मला मतदार संघात अडकविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते नाही जमलं. अमित शहा आणि पवार यांनी काय केलं असा प्रश्न विचारला होता आणि त्यांना लोकसभेत त्याचं उत्तर मिळालं. हे लोक आता देखिल विचारत आहे काय केलं आता उत्तर मिळेल 23 तारखेला. योगी आले आणि बटेंगे तो कतेंगे म्हणतात मात्र आमच्या महाराष्ट्रत ही भाषा चालणार नाही. आमच्या राज्यात द्वेष पेरण्याचे काम करत आहेत. मी भाजपाला सांगतो मोदी शाह यांच्या अनेक सभा घ्या. मात्र 200 पारचा आकडा झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला 3 लाखाची कर्ज माफी मिळेल. महालक्ष्मी योजना सुरु करणार 3 हजार खात्यात येणार, राम शिंदेंवर टीका करत रोहित पवारांनी आपले वक्तव्य व्यक्त केले.