revoting Team Lokshahi
विधानसभा निवडणूक 2024

परळी मतदार संघात 122 मतदान केंद्रांवर फेर मतदान होणार?

परळी मतदार संघात मतदान केंद्रावर झालेल्या प्रकारानंतर फेर मतदान घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली. याबाबतचे पत्र निवडणूक विभागाला देण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • 'परळी मतदारसंघातील 122 केंद्रांवर फेरमतदान घ्या'

  • शरद पवारांचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांची मागणी

  • राजेसाहेब देशमुखांनी निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र

  • 'EVM आम्ही नाही, तर परळीतील गुंडांनी फोडल्या'

  • राजेसाहेब देशमुख यांचा आरोप

परळी मतदारसंघात मतदानादरम्यान अनेक गैरप्रकार झाले आहेत. मतदार संघातील 122 केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्याचे व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल करण्यात आले. याबाबतचे पत्र निवडणूक विभागाला देण्यात आले आहे.

परळी मतदारसंघात मतदाना दरम्यान अनेक गैरप्रकार झाले आहेत. मतदार संघातील 122 केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्याचे व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल करण्यात आले. या ठिकाणी एकच व्यक्ती मतदान करत होता. याबाबतच्या तक्रारी आम्ही प्रशासनाकडे केली. परंतु कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे या सर्व मतदान केंद्रावर फेर मतदान घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली. याबाबतचे पत्र निवडणूक विभागाला देण्यात आले आहे.

ईव्हीएम मशीन आम्ही नाही तर परळीतल्याच गुंडांनी फोडल्या. बोगस मतदान त्यांनी केले आणि पोलीस आमच्या मागे लावले असल्याचा राजेसाहेब देशमुख यांनी आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी फेर मतदानाची मागणी करणारे पत्र निवडणूक विभागाला पाठवले आहे.

ईव्हीएम मशीन फोडण्याची घटना घडली ती आमच्या कार्यकर्त्यांनी नाही तर परळीतील गुंडांनी केली. बोगस मतदान त्यांनी केले आणि खोटे गुन्हे दाखल करून पोलीस आमच्या मागे लावले असा गंभीर आरोप उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. ईव्हीएम फोडण्याच्या गुन्ह्यात अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. ही सर्व मुले अगदी मतदान केंद्राच्या परिसरातच काय त्या गावात सुद्धा गेले नव्हते तरी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. आम्ही याबाबतही वरिष्ठांकडे दाद मागणार आहोत असं देशमुखांनी म्हटलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे