महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या ठिकठिकाणी सभा होत असून, शुक्रवारी सकाळी गुहागर येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना, एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा मग बघा कसा कोकण गोवा, केरळपेक्षा मोठा श्रीमंत होईल. फक्त तुम्हाला माणसं बदलावी लागतील; आम्ही सत्तेत नसताना इतकी कामं केली. जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही काय करू? मी सत्तेसाठी मागत नाहीये, खुर्चीसाठी नाही मागत आहे. माझी इच्छा आहे की मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती माझ्याकडे आहे", अशी साद त्यांनी कोकणातील मतदारांना घातली.