निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पुण्यात उद्योग विभाग अंतर्गत सर्व स्थापनांना अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना भर पगारी सुट्टी द्यावी किंवा दोन तासांची सवलत द्यावी असा याठिकाणी आदेश जारी करण्यात आलेला आहे.
या संदर्भात उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्ण विभागाने परिपत्रक जारी केलेलं आहे. तशी माहिती जिल्हा अधिकारी सुहास तिवसे यांनी दिली आहे. तर मतदानासाठी योग्य ती सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता येण शक्य न झाल्याने तक्रार आल्यास संबंधीत स्थापनांन विरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असं देखील परिपत्रकात नमुद केलं आहे. तस जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.