महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानप्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यात जास्तीत जास्त मतदान केलं जावं यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे. मात्र, आम्ही तुम्हाला अशा गावाची माहिती सांगणार आहोत की ज्या गावामध्ये एकही मतदान होणार नाही.
आज सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांबा लागल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात १८.१४ टक्के मतदान झाले आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामध्ये एका गावामध्ये अजून एकही मतदान झालेले नाही. नेमकं काय कारण जाणून घेऊया.
थोडक्यात
निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचं
कन्नड तालुक्यामधील रामनगरमध्ये अजूनही मतदान नाही
जवळपास १५०० गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
स्मशानभूमीच्या प्रलंबित मागणीसाठी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
रामनगरमध्ये मतदानावर टाकला बहिष्कार
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठी एक-एक मत महत्वाचं असतं. मतदान सुरू झाल्यापासून आता ४ ते ५ तास झाले आहेत. जवळपास १५०० गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कन्नड तालुक्यामधील रामनगरमध्ये अजूनही मतदानाला सुरूवात झालेली नाही. रामनगरवासियांनी मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकला आहे. १४६६ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. स्मशानभूमीच्या प्रलंबित मागणीसाठी गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता त्यांची समजूत काढण्यासाठी कोणं जातं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचा फटका उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे.