नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या चर्चेवर अजित पवार यांचं वक्तव्य आता समोर येत आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीसंदर्भात सुरु असलेली चर्चा अतिशय चुकीची आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा अजून सुरु आहे असं स्पष्ट वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. अनेकांच्या उमेदवारी संदर्भात अजून चर्चा सुरु आहेत.
नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याचा सुर सध्या महायुतीमध्ये उमटतो आहे. त्यामुळे आता भाजपचा नकार डावलून अजित पवार नवाब मलिक यांना उमेदवारी देणार का? याकडे आता सगळ्यांच लक्ष आहे.
तर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देखील मिळाला आहे. मात्र नवाब मलिक यांच्या विषयी भाजपकडून नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांना उमेदवारी दिली जाणार का? हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.