विधानसभा निवडणूक 2024

महायुती की महाविकास आघाडी? सकाळी 8 वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सकाळी 8 वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात

  • मतमोजणी केंद्रांवर अधिकारी सज्ज

  • मतमोजणी केंद्रावर सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले. आज मतमोजणी होणार असून चित्र स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

प्रत्येक मतदार संघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आली असून मतमोजणी केंद्रांवर अधिकारी सज्ज झालेलं पाहायला मिळत आहेत. मतमोजणी केंद्रावर सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार? कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि आज 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार असून निकाल लागणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेसला मोठा धक्का; पृथ्वीराज चव्हाण पराभूत

Mahim Assembly Election Results 2024: माहीम विधानसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीमध्ये महेश सावंत विजयी

Ajit Pawar: शरद पवारांना धक्का, बारामतीमधून अजित पवार विजयी

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी