विधानसभा निवडणूक 2024

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे काल महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाच पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

कराड -अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला

संगमनेर - अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला

अमरावती - राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला

लातूर ग्रामिण - रमेश कराड यांच्याकडून धीरज देशमुख यांचा पराभव

राज्यातील 288 जागांसाठी सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा मतांचा टक्का वाढला. अनेक जण हे भाजप-राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या रणनीतीचा भाग मानत आहे. तर काही जण लाडक्या बहि‍णींचे वाढलेले मतदान मानत आहेत. पण यंदा भरघोस मतदान झाल्याने सर्व समीकरणं बदलली आहे

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे