थोडक्यात
बोरिवली विधानसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांची माघार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर भाजपा नेते गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया
बोरिवलीतून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे.
त्यानंतर त्यांची समजून काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु होते. यातच आज भाजप नेते विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली आणि समजूत काढली. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत गोपाळ शेट्टी म्हणाले की, मला अनेक नेते समजावयाला आले. भेटायला आले. एकदा नाही तर अनेकवेळा आले. म्हणून मी आता माघार घेत आहे. माझा मुद्दा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचलेला आहे. मी परत एकदा सांगतो. भविष्यात असा कुठेच बाहेरुन उमेदवार आणू नये या मताचा मी नाही. पक्ष शेवटी व्यक्तीपेक्षा मोठा असतो. व्यक्तीचे सर्वच म्हणणं ऐकून घेऊन पक्षाने ताबडतोप उत्तर द्यायला पाहिजे ही अपेक्षा गोपाळ शेट्टी यांची नाही आहे.
पक्षाकडे आपल्या भावना आपण मांडल्या आणि ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षाला समजण्यासाठी खूप वेळ लागेल. असं मला वाटत नाही. पक्षाच्या कार्यपद्धतीवर मी बोललो नाही. मी पक्षाच्या नेत्यांवरती पण नाराज नाही आहे. परंतु पक्षात असे काही नेते आहेत जे अशाप्रकारचे उद्योग करत असतात. त्यांच्याकडूनही नकळत होत असेल. परंतु नकळत होत असलेल्या गोष्टी लक्षात आणून देणं हे पक्ष कार्यकर्त्यांचे काम आहे ते मी केलं. असे गोपाळ शेट्टी म्हणाले. असे गोपाळ शेट्टी म्हणाले.