Election Commission introduces scaneer for searching polling booth 
विधानसभा निवडणूक 2024

तुमचं मतदान केंद्र कोणतं आहे हे शोधणं झालं आता सोप्पं...

निवडणूक आयोगातर्फे मतदारांसाठी क्यूआर स्कॅनर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आपलं मतदार यादीतील नाव तसेच आपलं मतदान केंद्र शोधण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे दोन क्यूआर स्कॅनर मतदारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. राज्यात सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून सज्ज आहे. मतदारांना आता मतदान केंद्र शोधणं सोप्पं जाणार आहे.

थोडक्यात

  • मतदारांना आता मतदान केंद्र शोधणं सोप्पं जाणार

  • नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज

  • निवडणूक आयोगातर्फे मतदारांसाठी क्यूआर स्कॅनर उपलब्ध

  • मतदार यादीतील नाव तसेच आपलं मतदान केंद्र शोधण्यासाठी स्कॅनर

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे. निवडणूक आयोगातर्फे मतदारांसाठी क्यूआर स्कॅनर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आपलं मतदार यादीतील नाव तसेच आपलं मतदान केंद्र शोधण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे दोन क्यूआर स्कॅनर मतदारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत. यामार्फत नागरिकांना मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधाण्यासाठी जो वेळ लागत होता तो वेळ यामध्यमातून वाचणार आहे.

दरम्यान, मतदानावेळी कोणतीही गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येतं असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन ऐरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी