विकास माने, बीड
बीडच्या परळी मतदारसंघात घाटनांदुर येथे वोटर मशीन फोडून गोंधळ घालण्याचा प्रकार समोर आला. आता याच विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे म्हणाले की, जे तुतारीचे उमेदवार दहशत आणि दादागिरीची भाषा बोलत होते. आज त्यांचे चिरंजीव मशीन फोडत असून बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. तर दहशत नेमकी कुणाची तुतारीच्या वरिष्ठ नेत्यांना कळालं पाहिजे आणि परळीच्या मायबाप जनतेला ही कळालं पाहिजे.
यासोबतच ते म्हणाले की, आजपर्यंत अशाप्रकारची घटना आणि गालबोट कधीच कुठे लागलं नाही. त्यामुळे कुणाला या ठिकाणी दहशत करायची आहे ही सगळी मानसिकता मायबाप जनतेच्या लक्षात आली आहे. याबाबत प्रशासनाला देखील तात्काळ कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: