सांगलीच्या खानापूर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर हे अकराव्या फेरी 51 हजार मतांच्या आघाडीवर आहेत,18 फेऱ्या पैकी अद्याप पाच फेऱ्या अजून शिल्लक आहेत, त्यामुळे सुहास बाबर यांचा विजय निश्चित झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वैभव पाटील यांचा पराभव झाला आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांनी विजयी मिळवला आहे. अकराव्या फेरी 51 हजार मतांच्या आघाडीवर आहेत, 18 फेऱ्या पैकी अद्याप पाच फेरया अजून शिल्लक आहेत,त्यामुळे सुहास बाबर यांचा विजय निश्चित झाला आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील व अपक्ष राजेंद्र देशमुख अशी तिरंगी लढत होती. तिरंगी लढत होत असली तरी दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील यांच्यातच अटीतटीची प्रमुख लढती होती.
विटा नगरपरिषद निवडणुकीत सदाशिवराव पाटील यांच्याबरोबर राहिलेले अशोक गायकवाड गटाने यावेळेला सुहास बाबर यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे काही नेते, कार्यकर्ते सुहास बाबर यांच्याबरोबर राहिले. शिवाय काही पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी महायुतीत प्रवेश करून बाबर यांच्या मागे ताकद उभा केली होती.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात काही नाराज कार्यकर्त्यांनी प्रवेश करून वैभव पाटील यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला होता. तर, अपक्ष राजेंद्र देशमुख यांच्यामागेही कॉंग्रेसचे काही नेते, कार्यकर्त्यांनी ताकद उभा केली. मात्र, बाबर व पाटील यांच्यातच अटीतटीची प्रमुख लढत पहायला मिळाली.