उमेदवार प्रोफाईल

Milind Narote Gadchiroli Vidhan Sabha constituency: काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांचे आव्हान

गडचिरोली विधान सभा मतदारसंघात डॅा. मिलिंद नरोटे भाजपचे उमेदवार. वैद्यकीय आणि सामाजिक कार्यात ओळख असलेल्या नरोटे यांना काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांचे आव्हान.

Published by : shweta walge

गडचिरोली

उमेदवाराचं नाव - डॅा.मिलिंद रामजी नरोटे

मतदारसंघ - गडचिरोली

उमेदवाराची माहिती - (विभाग) - विदर्भ

पक्षाचं नाव - भारतीय जनता पक्ष

समोर कोणाचं आव्हान - काँग्रेसचे उमेदवार मनोहर पोरेटी आणि बंडखोरी झाल्यास भाजपचे बंडखोर डॅा.देवराव होळी यांचे आव्हान राहील.

उमेदवाराची कितवी लढत - पहिली

राजकीय कारकिर्द

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. वर्षभरापूर्वीपर्यंत स्वत:चे रुग्णालय चालवत होते. सोबत स्पंदन फाऊंडेशन या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. वर्षभरापूर्वी भाजपमध्ये सक्रिय झाले. आदिवासी आघाडीचे प्रभारी जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविले होते. भाजपसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या उमेदवारीसाठी शिफारस केली होती.

डॉ. नरोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून गडचिरोली परिसरात आपल्या सामाजिक कार्यासाठी त्यांची ओळख आहे. याची दखल घेत भाजपाने त्यांना संधी दिली. लोकसभेतही त्यांचे नाव चर्चेत आले होते. संघ परिवाराच्या अत्यंत विश्वासू चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे बघितले जाते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी