उमेदवार प्रोफाईल

Amol Khatal win Sangamer Assembly Election Result 2024: बाळासाहेब थोरातांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; अमोल खताळ विजयी

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव करून शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ विजयी. काँग्रेसच्या सात वेळा विजेत्या थोरातांचा बालेकिल्ला भाजपच्या माजी प्रमुखाने घेतला.

Published by : shweta walge

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का देत शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी विजयी मिळवला आहे. बाळासाहेब थोरातांचा हा पराभर सर्वात मोठा धक्का असल्याच सांगितलं जात आहे. कारण अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सलग सात वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यातच अमोल खताळ यांनी मिळवत जायंट किलर ठरले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केला आहे.

सामाजिक प्रश्नांसाठी प्रशासनालाही अंगावर घेणारा नेता ही खताळांची ओळख आहे. शिंदे गटाने तिकीट देण्यापूर्वी अमोल खताळ हे भाजपचे मतदारसंघ प्रमुख होते. गेली चार दशकांपासून संगमनेर हा थोरातांचा बालेकिल्ला समजला जात आहे. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून येथे भाजपने व अमोल खताळ यांनी सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर संगमनेरमध्ये मातब्बर उमेदवार नसल्याने थोरातांची निवडणूक ही एकतर्फी होत होती, मात्र आता अमोल खताळांमुळे थोरातांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.

यापूर्वी या मतदारसंघात सुजय विखे हेच थोरातांविरोधात लढणार असे वातावरण तयार झाले होते. सुजय विखे यांनी या तालुक्यात जवळपास पाच-सहा जंगी सभा घेत वातावरण निर्मातीही केली होती. मात्र शेवटच्या क्षणी भाजपऐवजी शिंदे गटाला हा मतदारसंघ गेल्याने अमोल खताळ यांच्या पारड्यात उमेदवारी पडली.

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी