लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर ताकही फुंकून पितो आहे, लोकसभेत काम करुन देखील निकाल हा माझ्यासठी अनपेक्षित होता, असं वक्तव्य अजित पवारांनी लोकशाही मराठीच्या मुलाखतीत केलं आहे. एकप्रकारे अजित पवारांनी आपली खंत यावेळी वक्त केली होती. बारामतीकरांनी आग्रह केल्यानंतर आता विधानसभेच्या रिंगणात आपण उतरले असून शरद पवारांनी माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार दिला असल्याचं देखील अजित पवार म्हणाले आहेत.
यदरम्यान अजित पवार म्हणाले की, आमच्या समोरच्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याला सामोरे जाण याशिवाय आमच्या हातात काही राहिलेल नाही. पहिली उमेदवारी माझी जाहीर झालेली होती त्याच्यामुळे समोरच्यांनी कोणता त्यांचा उमेदवार जाहीर करायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता. हे जे काही झालं आहे ते जाणीवपुर्वक झालं आहे की नाही ते मला माहित नाही.
मी माझी उमेदवारी मला बारामतीकरांनी आग्रह केल्यानंतर पक्षाच्या पार्लामेंट बोर्डाकडून सांगितल तुम्हाला दुसरा उमेदवारी संघ स्विकारता येणार नाही तुम्हाला इथचं बारामतीमध्ये उभ रहाव लागेल. ज्यावेळेस दुधाने तोंड पोळत त्यावेळेस माणूस ताक देखील फुंकून पितो असं म्हटलं जात. त्याच्यामुळे लोकसभेचा निकाल आमच्या डोळ्यासमोर आहे. काम करून देखील तो निकाल मला पाहायला मिळाला. त्यामुळे मतदारांना भेटून त्यांना पटवणे हे माझं काम आहे एक उमेदवार म्हणून आणि ते मी करणार, असं अजित पवार म्हणाले आहेत.