वसई-विरार,नालासोपाऱ्यातील नावाजलेले नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांचा दाणुन पराभव झालेला आहे. नालासोपाऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी नालासोपाऱ्यात एक घटना घडली ज्यामध्ये नालासोपाऱ्याच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे सचिव विनोद तावडे यांना बविआच्या नेत्यांनी पैशांच्या बॉक्ससोबत रंगे हात पकडल होत त्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण होते मात्र आता बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांचा आता पराभव झालेला आहे.
भाजपाचे उमेदवार राजन नाईक आणि बविआचे क्षितीज ठाकूर यांच्यात लढत लढली होती तर राजन नाईक यांना १,१०,७५५ मते मिळाली आणि क्षितीज ठाकूर यांना ८६,०३८ मते मिळाली.त्यामुळे राजन नाईक हे २४,७१७ मतांची आघाडीवर होते आणि त्यांचा विजय झाला. तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबे यांच्यात लढत होती आणि स्नेहा यांनी विजय मिळवला आहे.
वसई-विरारमध्ये गेल्या 35 वर्षांपासून एकहाती सत्ता राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीला यंदा मोठा धक्का बसला आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.