विधानसभेचं बगुल सर्वत्र पाहायला मिळत आहे. 20 तारखेला राज्यात मतदान पार पडलं आणि आज म्हणजेच 23 तारखेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल आहे. आज सर्व पक्षातील नेते काही ठिकाणीवर आघाडी तर पिछाडीवर येताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान महायुती आघाडीवर पाहायला मिळत आहे. तर भाजप हा सर्वपक्षांपेक्षा पुढे गेलेला पाहायला पाहायला मिळत आहे.
याचपार्श्वभूमीवर नरेश म्हस्के म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे की, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुर्ण मंत्रीमंडळ यांनी केलेलं काम तसेच लोकांसाठी घेतलेले निर्णय याचा विजय आज झालेला आहे.
त्याचसोबत महाराष्ट्रला खरी शिवसेना कोणाची हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर महाराष्ट्रतील जनतेने दिलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ते कसे योग्य आहेत. तसेच महाराष्ट्राच विकास कशा पद्धतीने घडू शकतो याचं उत्तर आजच्या निकालाने दिलेलं आहे.