राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरले होता. त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार देखील केलेला आपल्याला पाहायला मिळाला मात्र आज निकालाच्या दिवशी मनसेचे उमेदवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभूत झालेला पाहायला मिळत आहे. तर यामुळे आता मनसेला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळाला आहे. माहिममध्ये तिहेरी लढत पाहायला मिळालेली होती.
त्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. या तिन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर होईल असं वाटत होतं. पण अखेर महेश सावंत यांनी विजयाचा पटका मिळवला आहे. अमित ठाकरे हे या लढतीमध्ये तिसऱ्या क्रमाकांवर होते. सदा सरवणकर यांना 45 हजार 236 मत होती तर अमित ठाकरे यांना 30 हजार 703 इतके मत होती तसेच महेश सावंत यांना 46 हजार 579 इतके मत असून त्यांनी 1500 पेक्षा अधिक मतांनी महेश सावंत यांनी विजय मिळवलेला आहे.