जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला. महायुतीने सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकल्या आहेत. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारे काही आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय झाला आहे. एकनाथ शिंदेंचा १, ५९ हजार ६० मतांनी विजय झाला आहे तर केदार दिघे यांना ३८,३४३ इतके मत मिळाले आहे. यामुळे ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष पाहायला मिळत आहे.
शिवसेना नेते राहुल कनाल यांच्याकडून एकनाथ शिंदेंचे मुंबई शहरात बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरमध्ये म्हटले आहे की, मी एकनाथ संभाजी शिंदे, शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आंनद दिघेंच्या आशिवार्दाने इश्वर साक्ष शपथ घेतो की, महाराष्ट्राच्या सुख, समृध्दी आणि शांतीसाठी कटीबध्द राहिन.