विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुती आघाडीवर पाहायला मिळत आहे. तर भाजप हा सर्वपक्षांपेक्षा पुढे गेलेला पाहायला पाहायला मिळत आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीसांचे मोठे भाऊ आशिष फडणवीस हे प्रतिक्रिया देत म्हणाले की, गेल्या 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस यांची मेहनत आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आहे देवेंद्र हे जरी उपमुख्यमंत्री झाले असले तरी यावेळेस तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास आहे आम्हाला.