२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वुर राणाला भारताकडे सोपवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. राणाने अमेरिकन कोर्टात केलेली हिबीयस कॉर्पस याचिका कोर्टाने फेटाळलीय. राणाला हा मोठा दणका आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही राणाने केलीय. या नव्या याचिकेचा निर्णय येईपर्यंत भारताकडे आपलं हस्तांतरण केलं जाऊ नये अशी मागणी राणाने केलीय. मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राणाविरोधात देशात खटला सुरू आहे. त्यासाठी त्याचा ताबा घेण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.