व्हिडिओ

Badlapur School Case : आंदोलनदरम्यानचे व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती

बदलापूर घटनेमध्ये पोलीस तपासात मोठे खुलासे समोर आलेले आहेत. बदलापूर घटनेदरम्यान करण्यात आलेले आंदोलन हे पुर्वनियोजित असल्याच पोलीस तपासातून समोर आलेलं आहे.

Published by : Team Lokshahi

बदलापूर घटनेमध्ये पोलीस तपासात मोठे खुलासे समोर आलेले आहेत. बदलापूर घटनेदरम्यान करण्यात आलेले आंदोलन हे पुर्वनियोजित असल्याच पोलीस तपासातून समोर आलेलं आहे. आंदोलनादम्यानचे फोन व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. बदलापूर प्रकरण तोडफोड प्रकरणी 68 जणांना अटक ही झालेली आहे. जवळपास 100 पेक्षा जास्त जण या प्रकरणी फरार असल्याचे देखील समोर आलेलं आहे.

दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले होते त्यांनी रेल्वेरोको आंदोलन केलं होत. तसेच त्यांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन देखील केलं होत. यादरम्यान पोलीस तपासानुसार हे आंदोलन पुर्वनियोजित होतं असं समोर आलेलं आहे. त्यामुळे हे पुर्वनियोजिन आंदोलन नेमकं कोणी घडवून आणलेलं होत असा प्रश्न समोर आला आहे. त्याचसोबत ज्या घटनेमुळे हे आंदोलन करण्यात आलं त्या आरोपीला कधी शिक्षा होणार असा देखील प्रश्न याठिकाणी उपस्थित झाला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी