कर्जत पनवेल दरम्यान नवीन रेल्वेमार्ग तयार होत आहे. तर हा रेल्वेमार्ग कर्जत तालुक्यातील हालिवली, किरवली गावातून पुढे जात आहे. तर या रेल्वे मार्गावर नव्याने दोन बोगद्यांचे काम देखील सुरू आहे. मात्र या नविन रेल्वेमार्गाच्या कामासाठी ठेकेदाराने अनधिकृतपणे केलेल्या ब्लास्टिंगमुळे दोन्ही गावांचे नुकसान झालेले असल्यामुळे या दोन्ही गावातील घराला तडे जाणे, बोरिंगचे पाणी आटने, आदी घटना घडल्या आहेत. त्यामुळे या बाबत नुकसान भरभाई व पाण्याची होत असलेली कमतरता यासाठी सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी उपोषण सुरू केले आहे. हालिवली व किरवली गावातील ग्रामस्थांना झालेली व होणारी संभाव्य नुकसान भरपाई देण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले होते. मात्र तीन महिने झाले तरीही ब्लास्टिंगची तीव्रता काही कमी झाली नाही. तसेच ग्रामस्थांना कोणती ही नुकसान भरपाई देण्यात ही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आली नाही.