नाशिकमधील महिंद्रा कंपनी परराज्यात गेल्याचा फेक नॅरेटिव्ह सेट केला जात असल्याचं सत्ताधारी म्हणतं आहेत. काही राजकीय नेते ही फेक नॅरेटिव्ह सेट करत असल्याचं उदय सामंत यांनी केला आहे. तर यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं महिंद्रा कंपनीने स्पष्ट केलं आहे असा दावा ही उदय सामंत यांनी केला आहे.मविआच्या नेत्यांनी फेक नॅरेटिव्ह सेट करू नये अस उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे.
सरकारला बदनाम करण्याचा डाव सुरु आहे असं देखील ते म्हणाले. महिंद्रा कंपनीला ते स्वतः भेट देणार असल्याच ते म्हणाले तर महिंद्रा कंपनी केंद्रसरकारचा दबाव आहे महाराष्ट्रमध्ये त्यांची कंपनी सुरु न ठेवता ती इतर ठिकाणी हलवावी असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. तर आता उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.