शिवसेना आमदार अपात्रतेची लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे. नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गट आव्हान देणार आहेत. कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी आहे. पुढील आठवड्यात याचिका दाखल केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना १९९९च्या घटनेचा आधार घेत उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद अस्तित्वात नसल्याचे निरीक्षण नोंदवले. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. पुढील आठवड्यात याविषयीची याचिका दाखल केली जाणार आहे. 2019 साली एनडीएचे सरकार स्थापन करताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याचे पत्र तसेच पक्षप्रमुख म्हणून निवडणूक तसेच अन्य निर्णयांबाबत ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून स्वाक्षरीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली जाणार आहेत.