संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 20 जुलै ते 11 ऑगस्ट असं 23 दिवस संसदेचं अधिवेशन चाललं. शेवटच्या दिवशीसुद्धा मणिपूरच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत गुरुवारी फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली.