व्हिडिओ

RBI : यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर 7 टक्के राहणार, RBI ने वर्तवला अंदाज

चालू आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण RBI ने जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा निकाल आज जाहीर झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

चालू आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण RBI ने जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा निकाल आज जाहीर झाला आहे. आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो दर 6.5 टक्के आहेत. आरबीआयची बैठक 3 एप्रिलपासून सुरू झाली असून आज याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. रिझर्व्ह बँकेने आज रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवला आहे.

व्याजदरात कोणतेही बदल होणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ झाली होती. 3 ते 5 एप्रिल दरम्यान पतधोरण समितीची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी