कल्याण स्टेशन परिसरात रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचले आहे. कल्याण स्टेशन परिसरात केडीएमसीच्या कपोते वाहन तळ्यासमोर रस्त्याला नदीचे स्वरूप पाहायला मिळत आहे. पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला तारेवरती कसरत करावी लागते आहे.
कल्याण कोर्ट ते स्टेशनं रोड वर पाणीच पाणी साचलेलं आहे. रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील गुडघ्यावर पाण्यातून जावे लागत आहे. पावसाअगोदर महानगरपालिकेने लाखो रुपयाचे टेंडर काढले होते. नालेसफाई झाली नाही तर पैसा गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.