रायगडच्या माणगावमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिवसेना आक्रमक झाली आहे. दोन्ही शिवसेने मधील वाद हा नवीन नसला तरी आता वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष पून्हा वाढू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती ठाकरे गटाकडून सातत्याने टिका होत असल्याने आता रायगड मधील शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व ठाकरे गटाच्या शिवसेनेचा जाहीर निषेध करणारे बॅनर मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गासह माणगाव बाजारपेठेत लागल्याने राजकीय तणाव निर्माण झाला आहे.