महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019 मध्ये टीईटी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 16 हजार 592 परीक्षार्थीं पात्र झाले होते. प्रत्यक्षात पुणे सायबर पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर 7 हजार 800 परीक्षार्थी अपात्र होते. पण शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी आणि खासगी एजंट यांनी संगनमत करून, अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतले.
त्यानंतर त्यांना उत्तीर्ण करून पात्र ठरवले. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजीही झाली होती. साडेचार लाख परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. यातील अनेकांना लाच घेऊन पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आलाय आणि याच प्रकरणी सुपे यांना डिसेंबर 2021 मध्ये अटक झाली होती. या शिक्षकांची सेवा कधी समाप्त करणार, असा प्रश्न विचारण्यात येतोय.