लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार असे सुनील तटकरे म्हणाले आहेत. राज्यभरात महायुतीचे मेळावे घेणार असल्याचे तटकरेंनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. 14 जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होतील. 'महायुतीचं लोकसभेसाठी 45 जागांचे टार्गेट आहे आणि बूथस्तरावरही मेळावे घेतले जाणार आहेत अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यामध्ये या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.