राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होतोय... यंदा राज्यात 12 लाख 32 हजार हेक्टरवर उसाची (sugarcane)लागवड झाली... त्यामुळे अतिरिक्त उसाच्या गाळपाची मोठी समस्या निर्माण झालीय... परिणामी बीडमधील नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला आणि स्वताच्या आयुष्याचीही अखेर केली... शिवाय आणखी एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिलाय... कारण एकच उसाचं गाळप होत नाही... साखर कारखानदार अतिरिक्त ऊस गाळपासाठी प्रतिसाद देत नाहीत... त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय... म्हणून साखर कारखानदार ऐकणार नसतील तर... सरकारने अतिरिक्त ऊसाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागलीय... याच बाबतीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांशी बोलायचंय....