दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी स्थापन होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश आजच जारी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे मुंबई पोलिसांना आदेश जाणार आहेत.अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.