पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अटकेतील दोन दहशतवाद्यांना गोधरा हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता अशी माहिती समोर आली आहे. शाहनवाज आलम याने तसा कबुलीजबाबचा पोलीस तपासात दिला आहे. तसेच संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचं समजत आहे. दरम्यान दहशतवाद्यांच्या संपर्कात पाकिस्तानातून अबू सुलेमानही होता असेही शहनावजने तपासात सांगितलं आहे. दरम्यान 18 मे रोजी पुणे पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान दोन दहशतवाद्यांना कोथरूड येथून ताब्यात घेतले होते.