जत तालुक्यातल्या उमदी इथल्या आश्रमशाळेत 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झालीय. त्यांना तातडीनं माडग्याळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. काही विद्यार्थ्यांचे प्रकृती अधिक बिघडल्यानं त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलंय. रात्री जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलटी, मळमळ आणि जुलाब सुरू झाली. मुलांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.